९ एप्रिलला सहकारी बँकांचा बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 April 2013

९ एप्रिलला सहकारी बँकांचा बंद


मुंबई : सहकार कायद्यातील ९७वी घटना दुरुस्ती कामगार विरोधी असून सहकार क्षेत्राला मारक ठरत असल्यामुळे या घटनादुरुस्तीला विरोध करण्यासाठी मुंबईतील सहकारी बँका मंगळवार, ९ एप्रिल २0१३ रोजी एक दिवस लाक्षणिक बंद पाळणार असल्याची घोषणा को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे मुंबई अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली आहे. या दिवशी को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व सहकारी बँकांची व राज्यपातळीवरील सहकारी संस्थांची कार्यालये बंद राहणार आहेत. तसेच सहकारी बँकातील व संस्थातील कर्मचारी जिजामाता उद्यान भायखळा ते आझाद मैदानपर्यंत भव्य मोर्चाही काढणार असल्याचे अडसूळ यांनी सांगितले आहे. 

केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान सहकारी कायदा लागू करण्यासाठी सहकारी कायद्यात ९७ वी घटना दुरुस्ती केली असून, ती महाराष्ट्र शासनाने १५ फेब्रुवारी २0१३ पासून लागू केली आहे. या दुरुस्तीमध्ये सहकारी बँक व्यवस्थापनात कामगारांचा समावेश असावा ही अट काढून टाकण्यात आली आहे. तसेच सहकार क्षेत्रावरील सरकारी नियंत्रणदेखील कमी केले आहे. यामुळे सहकार क्षेत्राच्या खाजगीकरणाला प्रोत्साहन मिळणार आहे. यामुळे मूळ १९६0 सहकार कायद्यातील कलम ७३ ब तरतूद पुन्हा जशीच्या तशी समाविष्ट करावी, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad