मुंबई - उन्हाळ्यात दाट आमराईत शिरून रसरशीत, गोड चवीचे आंबे चाखण्याचे भाग्य केवळ कोकणातील वाड्यांमध्ये राहणाऱ्यांनाच... हे कालपर्यंत खरे होते. आता कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनाही अगदी घरगुती वातावरणात राहून आंब्यांची धम्माल चव चाखता येईल. त्यासाठी एमटीडीसी आणि कोकण भूमी प्रतिष्ठान यांनी 11 एप्रिल ते 9 जून या कालावधीत "कोकण अल्फान्सो टुरिझम फेस्टिव्हल'चे आयोजन केले आहे.
या फेस्टिव्हलअंतर्गत पर्यटकांना कोकणातील विविध भागांमध्ये चार दिवस मनसोक्त भटकंती करता येईल. या टूरमध्ये हॉटेलमध्ये न राहता स्थानिकांच्या घरी वास्तव्य करता येईल आणि आमराईतील आंबे तोडून खाण्याची मजा अनुभवता येईल. समुद्रकिनाऱ्यावरची धमालही या टूरमध्ये करता येईल. कोकणामधील पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे, देशी-विदेशी पर्यटकांनी कोकणाला मोठ्या प्रमाणावर भेट द्यावी यासाठी या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या टूरला पाच हजारांहून अधिक पर्यटकांचा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा "कोकण भूमी प्रतिष्ठान'चे संजय यादवराव यांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment