मुंबई - बेस्ट बसच्या दरवाजात उभे असलेले "सकाळ'चे जाहिरात प्रतिनिधी अमित सर्जेराव सरवदे (25) यांचा आज सकाळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या बसला धडकल्याने मृत्यू झाला. महापालिका मुख्यालयासमोर हा अपघात घडला. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी रात्री उशिरा या बेस्ट बसच्या नवनाथ शिंदे (45) या चालकाला अटक केली.
विक्रोळीत राहणारे सरवदे आज कार्यालयीन कामासाठी दक्षिण मुंबईत गेले होते. सकाळी पावणेबाराच्या सुमारास ते महापालिका मुख्यालयाच्या इमारतीसमोरील बसथांब्यावर बसची वाट पाहत उभे होते. त्या वेळी थांब्यावर 69 क्रमांकाची बेस्ट बस उभी होती. या बसच्या मागून आलेल्या 14 क्रमांकाच्या बसमध्ये सरवदे चढले. बस सुरू झाल्यानंतर चालकाने ती 69 क्रमांकाच्या बसला अगदी चिकटून पुढे नेली. त्यामुळे बसच्या दारातच उभे असलेले सरवदे 69 क्रमांकाच्या बसवर धडकले. या अपघातात जबर जखमी झालेल्या सरवदे यांना तातडीने उपचारासाठी गोकुळदास तेजपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र हाताची रक्तवाहिनी आतून फुटल्याने शरीरात रक्त पसरून दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेले सरवदे रुग्णालयात नेताना पूर्णपणे शुद्धीत होते. उपचारासाठी नेणाऱ्या पोलिस व डॉक्टरांशी ते काही वेळ व्यवस्थित बोलले. त्यामुळे हा मृत्यू अपघाती असला, तरी त्यामागील कारण शोधण्याकरिता शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांचा व्हीसेरा परीक्षणासाठी जतन करून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.
"सकाळ'मध्ये वर्षभरापासून जाहिरात प्रतिनिधी म्हणून काम करणारे सरवदे यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.

No comments:
Post a Comment