मुंबई- वरळीतील उच्चभ्रू लोकांची वसाहत असलेल्या कॅम्पाकोला कंपाउंडमधील 17 मजल्यांवर सोमवारी मुंबई महापालिकेचा हातोडा पडणार आहे. या इमारतीतील 140 सदनिका उद्ध्वस्त करण्यात येणार असून त्याची किंमत आजघडीला 300 कोटींच्या आसपास आहे. महापालिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरेल.
1955 मध्ये मुंबई महापालकेने कॅम्पाकोला कंपनीस वरळी नाक्यावरचा भूखंड 99 वर्षांच्या कराराने भाड्याने दिला होता. या भूखंडावर 1980 मध्ये बांधकामास सुरुवात झाली. 17 आणि 20 मजल्यांच्या दोन इमारती बांधण्यात आल्या. त्यात 2 हजार चौरस फुटांच्या एसएफआयचे उल्लंघन झाले असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. त्यामुळे या इमारतीतील 140 सदनिका अनधिकृत ठरवत पालिकेने 2005 मध्ये बांधकाम तोडण्याची नोटीस बजावली.
याचिका फेटाळली
पालिकेच्या नोटिसीला रहिवाशांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने घरमालकांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र 27 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयानेही परवानगी न घेता केलेले बांधकाम तोडण्याचे आदेश दिले. पालिकेने या ऐतिहासिक कारवाईसाठी एक समिती नियुक्त केली आहे. कारवाईसाठी पालिकेने जय्यत तयारी केली असून त्यासाठी सोमवारचा दिवस निश्चित केला आहे. गेली 25 वर्षे सुरू असलेल्या या वादाची इतिश्री या ऐतिहासिक कारवाईने होणार आहे.
दीड कोटीचा खर्च
या कारवाईसाठी दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकाºयांच्या सदनिका या इमारतीमध्ये आहेत. कारवाईचा दिवस निश्चित झाल्याने अनेकांनी या इमारतीतून बिर्हाड हलवण्यास सुरुवात केली आहे.
न्यायालयाचे खडे बोल
या सदनिका अनधिकृत असल्याचे माहिती असूनही खरेदीचा व्यवहार केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने घरमालकांना चांगलेच फटकारले. तसेच या कारवाईत पुढारी, अधिकारी यांनी कोणताही हस्तक्षेप करू नये, अशी सक्त ताकीदही दिली आहे.
Post Top Ad
29 April 2013
Home
Unlabelled
300 कोटींच्या फ्लॅट्सवर आज होणार धडक कारवाई
300 कोटींच्या फ्लॅट्सवर आज होणार धडक कारवाई
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment