शाळेतील 25 टक्के प्रवेश एप्रिलमध्ये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 April 2013

शाळेतील 25 टक्के प्रवेश एप्रिलमध्ये


आर्थिक दुर्बल आणि सामाजिक वंचित घटकांतील मुलांना
मुंबई - आर्थिक दुर्बल आणि सामाजिक वंचित घटकांतील मुलांना खासगी शाळेत प्रवेश देण्यासाठी शाळांनी येत्या संपूर्ण महिनाभरात अर्ज स्वीकारायचे आहेत, अशा सूचना मुंबई शिक्षण उपसंचालकांच्या अखत्यारीतील सर्व शिक्षण निरीक्षकांद्वारे शाळांना देण्यात येणार आहेत. लवकरच वॉर्डनिहाय अधिकाऱ्यांच्या मुख्याध्यापकांसोबत बैठका होणार आहेत. 

मुंबई, ठाण्यातील सर्व खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांनी "एन्ट्री लेव्हल'ला एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि सामाजिक वंचित घटकांना प्रवेश द्यावयाचे आहेत. एप्रिलअखेरपर्यंत यासाठी शाळांनी अर्ज स्वीकारायचे आहेत. मे महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून 1 जूनपासून प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या लावायच्या आहेत, अशा सूचना सर्व शाळांना देण्यात येणार आहेत. अर्ज स्वीकारण्याबाबतचे वेळापत्रक शाळांनी त्यांच्या सोयीनुसार जारी करावे, अशा सूचना लवकरच वॉर्डनिहाय मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन देण्यात येणार आहेत, असे दक्षिण मुंबई विभागाचे शिक्षण निरीक्षक बाळासाहेब माने यांनी सांगितले. एप्रिल अखेरपासून सर्व शाळा बंद होतात, त्याआधी शाळांना संपर्क साधण्याची सर्व प्रक्रिया शिक्षण विभागाला करावी लागणार आहे.

लाभार्थी पालकांना 25 टक्‍क्‍यांतील प्रवेशांविषयीची माहिती देण्यासाठी मात्र शिक्षण विभागाने कोणतेही विशेष प्रयत्न केलेले नाहीत. याबाबत माने यांना विचारले असता, शाळांनी आपापल्या परिसरात पालकांना प्रवेशाबाबतचे आवाहन करण्यास सांगितले. त्यामुळे कोणत्या शाळेत किती जागा आहेत; अर्ज कधी करायचा, याबाबत पालक मोठ्या प्रमाणावर अनभिज्ञ राहण्याची भीती आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad