मुंबई - औद्योगिक न्यायालयाने वेतनवाढीबाबत निर्णय दिला असून, ही वेतनवाढ सहाव्या वेतन आयोगानुसार करावी; तसेच इतर प्रलंबित मागण्या निकाली निघाव्यात, याकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 17 तारखेला आझाद मैदानात शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय बेस्ट वर्कर्स आणि म्युनिसिपल मजदूर युनियनने घेतला आहे.
पालिका कर्मचाऱ्यांना 2011-12 मध्ये देण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानाप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे, युनियन आणि प्रशासन यांच्यात 28 एप्रिल 2012 रोजी झालेल्या करारानुसार थकबाकी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन बेस्ट समितीचे अध्यक्ष आणि बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांना दिले असल्याची माहिती कामगार नेते शरद राव यांनी दिली. विविध भत्ते, वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, थकबाकी आदी प्रलंबित मागण्यांसाठी हे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment