मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपात आपल्या पक्षाला शिवसेना-भाजपा युतीने ३0 ते ३५ जागा द्याव्यात, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. तसेच त्यांनी लोकसभेच्या दक्षिण मुंबईसह चार जागा मागितल्या असून युतीने रिपाइंला सन्मानाची वागणूक द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. आम्हाला गृहित धरून युतीने फरफटत नेले, तर त्या वेळी योग्य विचार करू, असा इशारा देऊन त्यांनी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव तंत्राचाही वापर करण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्रव्यापी पक्षबांधणीचा दौरा पूर्ण झाला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असा दौरा सुरू असतानाच आता रामदास आठवलेदेखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी दौरा करणार आहेत. त्यांनी मंगळवारी प्रेस क्लबमध्ये या दौर्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत रिपाइंला अपेक्षित असलेल्या जागांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे निळय़ा-भगव्याची सत्ता आणण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक-दोन महिन्यांमध्येच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा निर्णय घ्यावा. सन्मानाने ही जागा वाटप व्हावी. विधानसभेच्या ३0 ते ३५ जागा मिळाव्यात आणि लोकसभेच्या आम्हाला कमीत कमी चार जागा देण्यात याव्यात. लोकसभेच्या जागा दक्षिण मुंबई, लातूर, कल्याण, विदर्भ, नागपूर या भागांपैकी असाव्यात, असेही ते म्हणाले. वेळोवेळी मतदारसंघ बदलून लोकसभेची निवडणूक लढवायची की राज्यसभेवर निवडून जायचे, याबाबत आपण अद्याप निर्णय घेतला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मनसे युतीत येणार नाही. मनसे आलीच तर त्या वेळी आपली भूमिका मांडू. मी समाधानी आहे, मात्र सत्तेत योग्य वाटा मिळाला पाहिजे. दलित मतांना नाराज करण्यात येऊ नये, असे ते पुढे म्हणाले. आठवले यांच्या राज्यव्यापी दौर्यात १ मे रोजी पुणे, ११ मे रोजी नाशिक, १९ मे रोजी बीड, २६ मे रोजी मुंबई, १ जूनला कोल्हापूर येथे सभा होणार आहेत. दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही. अँस्ट्रॉसिटीच्या कायद्याचा वापर दलितांच्या हितासाठी न करता त्याचा अयोग्य वापर होत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. |
Post Top Ad
24 April 2013
Home
Unlabelled
विधानसभेच्या ३0 ते ३५ जागा द्या - रामदास आठवले
विधानसभेच्या ३0 ते ३५ जागा द्या - रामदास आठवले
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment