मुंबई : देशात सर्वात गरीब व मागासलेला समाज असणारा मुस्लीम वर्गाला २0 टक्के आरक्षण देऊन इतर समाजाप्रमाणे जगण्याची संधी द्यावी. हे आरक्षण कायमस्वरूपी न देता फक्त ३५ वर्षेच द्यावे, अशी मागणी नॅशनल लोक हिंद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बदी उज्जमाखान यांनी सोमवारी पत्रकार संघ येथे केली.
राजकीय, प्रशासकीय, आर्थिक क्षेत्रात २0 टक्के आरक्षण मिळावे, वक्फ बोर्डाच्या जमिनीची चौकशी व्हावी, मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळातील प्रलंबित कर्ज पुरवठा अर्जाचा विचार व्हावा, या व इतर मागण्या घेऊन पार्टीने सरकारदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment