जेएनपीटी बंदरात १६00 कंटेनर नौदलाच्या ताब्यात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 April 2013

जेएनपीटी बंदरात १६00 कंटेनर नौदलाच्या ताब्यात


आरडीएक्सचा साठा असल्याचा संशय
जेएनपीटी बंदरात आखाती देशातून माल घेऊन आलेल्या एमएसव्ही ब्रुनोशुल्टो या मालवाहू जहाजातील १६00 संशयास्पद कंटेनर मंगळवारी भारतीय नौदल आणि सीमाशुल्क विभागाने तपासणीसाठी ताब्यात घेतले. अत्यंत गुप्त पद्धतीने ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईबाबत स्थानिक पोलीसही अनभिज्ञ आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या १६00 कंटेनरपैकी दोन-तीन कंटेनरमध्ये आरडीएक्स किंवा सायनाईडचा साठा असल्याचा संशय वर्तवला जात आहे.

आखाती देशातील फॉरिट येथून कंटेनर भरलेले एमएसव्ही ब्रुनोशुल्टो हे मालवाहू जहाज सोमवारी सायंकाळी जेएनपीटी बंदरात दाखल झाले आहे. या जहाजातून आलेल्या १६00 कंटेनरमध्ये स्फोटक पदार्थ असल्याची अत्यंत गुप्त खबर भारतीय नौदलाला मिळाली. जहाजातील त्या स्फोटक पदार्थांचा घातपात घडवण्यासाठी वापर होऊ शकतो, या भीतीने भारतीय नौदल आणि सीमाशुल्क विभागाने संयुक्तरीत्या कारवाई करत जहाजातील संशयास्पद १६00 कंटेनर ताब्यात घेतले. 

सीमाशुल्क विभागाच्या मदतीने कंटेनरमधील मालवाहू जहाजाची कसून तपासणी केली जात आहे. जहाजाची तपासणी पूर्ण झाल्याशिवाय जेएनपीटी बंदरातून जहाजावर कोणत्याही प्रकारचा माल भरला जाऊ नये, असे आदेश भारतीय नौदलाच्या वतीने देण्यात आले आहेत. संशयास्पद कंटेनरपैकी दोन ते तीन कंटेनरमध्ये आरडीएक्स किंवा सायनाईड असल्याची गुप्त खबर नौदलाला मिळाली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर तपासकार्य सुरू ठेवण्यात आले आहे. या कारवाईबाबत आपणाला कोणतीच कल्पना नसल्याचे न्हावा-शेवा बंदर पोलीस विभागाचे एसीपी शशिकांत बोराटे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad