मुंबई / jpnnews.webs.com:
एकाच ठिकाणी गर्दी करून साहित्य संमेलन भरवण्याच्या काळात ई-साहित्य संमेलन चांगले आहे. जगभरातील तरुण पिढीने याचा फायदा करून घ्यावा. तंत्रज्ञानाच्या युगात तरुण ई-साहित्य संमेलन भरवून युनिक फीचर्सने चांगले काम केले आहे, असे मत कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी बुधवारी पत्रकार संघ येथे व्यक्त केले.
युनिक फीचर्सच्या ई-साहित्य संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी अध्यक्षपदावरून नेमाडे बोलत होते. या वेळी लेखक रत्नाकर मतकरी, सुहास कुलकर्णी, गौरी कानेटकर, आनंद अवधानी, शीतल भांगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना नेमाडे म्हणाले, वृत्तपत्रामध्ये छापून येणारे सगळे सत्य नसते. युनिक फीचर्स व इतर उपक्रमाच्या माध्यमातून जे साहित्य बाहेर येत आहे त्यातून समाजाला सत्य गवसेल. जगातल्या १0 भाषांमध्ये मराठीचा क्रमांक लागतो. इंग्रजांनाही मराठीची भीती वाटत होती. युनिक फीचर्स सारख्या संस्थामुळे तरी जगातील मराठी माणसांना एकत्र येता येईल. मराठी साहित्य त्यांच्यापर्यंत पोहचले. ई-साहित्य एकाच ठिकाणी गर्दी करून बदनामी पदरात पाडण्यापेक्षा बरे आहे, असे सांगत नेमाडे यांनी आज-कालचे मराठी साहित्य, देशीवादाची संकल्पना, आपल्या कादंबर्यांच्या नायकाचा प्रवास आदी उहापोल केला.
No comments:
Post a Comment