मुंबई : हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार, २ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशोकराव पेंढारी आणि कार्याध्यक्ष अँड़ व्यंकटराव बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी १0 वा. आझाद मैदान, मुंबई येथून मंत्रालयाकडे प्रस्थान करणार आहे.
जात पडताळणीचे दाखले देताना जात पडताळणी अधिकारी हिंदू खाटीक समाजाची अडवणूक करतात, ती अडवणूक थांबवण्यासाठी योग्य आदेश देणे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक मार्केटमध्ये बकर्यांच्या मंडीसाठी राखीव जागा ठेवणे तसेच समाजाचा प्रतिनिधी समितीवर घेणे, बकर्यांचे चामडे चर्मोद्योग महामंडळाने हमीभावाने खरेदी करणे, गटई कामगारांप्रमाणे तरुणांना मटण व्यवसायासाठी स्टॉल उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकेने मटण व्यवसायासाठी मार्केट उपलब्ध करून स्थानिक समाज बांधवांना ती प्राधान्याने द्यावीत, केंद्र सरकार योजनेंतर्गत कत्तलखान्यासाठी (स्लॉटर हाऊस) १00 टक्के अनुदान मिळते तरी ग्रामपंचायत, नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात शासनाने ही योजना राबवण्याची सक्ती करणे, जिल्हा, तालुका पातळीवर शेळय़ा, मेंढय़ा संस्था काढण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देणे
तसेच चरईसाठी ५ ते १0 एकर जागा देणे, जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यार्थी वसतीगृह उभारण्यासाठी जागा तसेच निधी उपलब्ध करणे, समाज अनुसूचित जातीमध्ये आहे, मात्र तरीही हिंस्र समाज म्हणून खाटीक या नावाचा उल्लेख होतो त्यामुळे हिंस्र संबोधन्यावर अँट्रॉसिटी लावणे आदी प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला राज्यासह देशाच्या अन्य भागातील सुमारे १ लाख समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती अशोकराव पेंढारी यांनी दिली. समाज बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी कुटुंबासमवेत मोर्चाला उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
No comments:
Post a Comment