मारहाण करणारे आमदार पोलिसांना शरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 March 2013

मारहाण करणारे आमदार पोलिसांना शरण

मुंबई / jpnnews.webs.com
विधान भवनाच्या लॉबीत सचिन सूर्यवंशी यां पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणारे निलंबित आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम पोलिसांना शरण आले आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. अटकेच्या भीतीने ते स्वत:हून शरण आले असून काही वेळातच त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

वाहतूक शाखेचे सबइन्स्पेक्टर सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याबद्दल कदम व ठाकूर यांच्यासह अन्य तीन आमदारांविरोधात मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय त्यांना अटक करता येत नव्हती पण, हे आमदार निलंबित झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आज त्यांच्या अटकेची शक्यता होती. ही अटक टाळण्यासाठीच दोन्ही आमदारांनी शरण जाण्याचा मार्ग अवलंबला असल्याचे बोलले जाते. या दोघांनाही वैद्यकीय तपासणीनंतर कोर्टात हजर केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad