मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या चार वैधानिक समित्यांवरील नवृत्त झालेल्या सदस्यांचा जागी नवीन सदस्यांच्या नेमणुका मंगळवारी करण्यात आल्या. या निवडी करताना मनसेकडून संदीप देशपांडे तसेच चेतन कदम या जोडीला स्थायी समितीतून हटवून त्यांच्या जागी मनीष चव्हाण, भालचंद्र आंबोदे यांची निवड केली गेली आहे. संदीप देशपांडे यांची वर्णी बेस्ट समितीवर करून गटनेत्यांकडून शह देण्याचा प्रकार केला गेल्याची चर्चा पालिकेत होती.
काँग्रेसकडून बेस्ट समितीवरील सदस्य निवडीत अनुभवी सदस्य रवीराज तसेच किसन जाधव यांना हटवून त्यांच्या जागी माजी नगरसेवक प्रमोद मांद्रेकर, माजी बेस्ट सदस्य शिवपूजन सिंह आणि अहमद घौस यांची वर्णी लावण्यात आली आहे. तर मनसेकडून केदार हुंबाळकर यांना पुन्हा संधी दिली गेली आहे. शिवसेनेने बेस्ट समितीवर कोणताही बदल केलेला नाही, तर भाजपाकडून स्वत: गटनेते दिलीप पटेल यांनी राजीनामा देत आपल्या जागी बिगर सदस्य श्रीनिवास त्रिपाठी यांची नव्याने वर्णी लावली असून मुंबई भाजपाचे अध्यक्षांचे चिरंजीव आकाश पुरोहित यांना पुन्हा संधी दिली आहे. पालिकेच्या सर्वात मुख्य असलेल्या स्थायी समितीत शिवसेनेकडून कोणताही बदल केला नसून त्याच सदस्यांना पुन्हा संधी दिली आहे. काँग्रेसकडूनही त्याच सदस्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून मात्र हारुन खान यांच्या जागी नगरसेविका राखी जाधव यांची वर्णी स्थायी समितीवर लावण्यात आली आहे, तर गटनेते धनंजय पिसाळ हे कायम राहणार आहेत. सुधार समितीवरही शिवसेनेने त्याच सदस्यांना कायम ठेवले आहे. काँग्रेसकडून विनी डिसोझा यांना नव्याने संधी देण्यात आली असून इतर सदस्य कायम राहणार आहेत. मनसेकडून मात्र पूर्वीच्या दोन्ही सदस्यांना बाजूला करून दीपक पवार व अविनाश सावंत या दोन नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे.
शिक्षण समितीवर शिवसेनेकडून सर्व सदस्यांना पुन्हा संधी देण्यात आली असून मनसेकडून ईश्वर तायडे यांना संधी दिली गेली, तर काँग्रेसने शिवानंद शेट्टी, फैयाज खान या दोन नवीन सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी त्यांनी डॉ. अंजना यादव यांना बाजूला केले आहे. राष्ट्रवादीकडून हारुन खान यांना संधी दिली असून स्थायी समितीतून बाजूला केल्यावर त्यांना या ठिकाणी सामावून घेतले आहे.
भाजपाच्या अंतर्गत वादामुळे पेच
भाजपा सोडून इतर पक्षांकडून आपल्या सदस्यांची नावे पालिका सभागृहात घोषित केली जात असताना भाजपामधील अंतर्गत वादामुळे त्यांची नावे घोषित केली नाही. भाजपामध्ये सुधार समिती अध्यपद देण्यावरून दोन मतप्रवाह असल्याने डॉ. राम बारोट की मनोज कोटक हा वाद उफाळून आल्याचे समजते. अखेर उशिरा भाजपा गटनेते दिलीप पटेल यांनी आपल्या सदस्यांची नावे जाहीर केली. त्यामध्ये स्थायी समितीत प्रवीण शहा यांच्या जागी माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांची वर्णी लावण्यात आली असून सुधार समितीमध्ये सर्व सदस्यांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपाकडून शिक्षण समितीत मनोज कोटक, मंगेश पवार, विनोद रोकड यांना नव्याने संधी दिली आहे.
Post Top Ad
20 March 2013
Home
Unlabelled
पालिका वैधानिक समित्यांसाठी सदस्यांची नावे जाहीर
पालिका वैधानिक समित्यांसाठी सदस्यांची नावे जाहीर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment