मुंबई- मालेगाव स्फोटप्रकरणी अटकेतील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित याला अद्याप लष्कराकडून सर्व भत्त्यांसह पगार मिळत असल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे. सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या स्फोटानंतर मुंबई एटीएसने पुरोहितला नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. त्याच्याबरोबर अभिनव भारतचे सदस्य आणि साध्वी प्रज्ञा सिंग यांनाही अटक करण्यात आली होती.
दहशतवादी कारवायांमधील आरोपी म्हणून पुरोहित गेली चार वर्षे तुरुंगात असूनही त्याला लष्कराकडून पूर्ण पगार मिळत असल्याची कबुली लष्कराने दिली आहे. दहशतवादी कारवायांमधील आणखी एक आरोपी मेजर रमेश उपाध्याय याने माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाला उत्तर देताना पुणे ऑफिस ऑफ प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट यांनी पुरोहितला पगार देत असल्याचे मान्य केले. तसेच पुरोहितशी संबंधित न्यायालयीन बाबीवर लष्कराच्या मुख्यालयातून कळवण्यात आलेले नाही, असेही या अर्जाच्या उत्तरात म्हटले आहे. ए. सीपीआयओ एन. डब्ल्यू. पेंडूरकर यांच्या सहीने 13 जून 2012 रोजी मुख्य माहिती अधिकारी, दिल्ली यांच्याकडे ही माहिती पाठवण्यात आली होती. याबाबत पश्चिम झोनचे प्रवक्ते कर्नल जगदीप दहिया यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
No comments:
Post a Comment