सत्ताधारी पक्षाकडून आंबेडकरी जनतेची बोळवण - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

22 March 2013

demo-image

सत्ताधारी पक्षाकडून आंबेडकरी जनतेची बोळवण


मुंबई : सत्ताधारी पक्षाने सन २0१२-१३ च्या मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेल्या वचननाम्यात दादर येथील इंदू मिलच्या जागेवर चैत्यभूमी येथे 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्याचा उल्लेख केला असला, तरी त्यासाठी सत्ताधार्‍यांनी अर्थसंकल्पात नाममात्र तरतूद करून आंबेडकरी जनतेची बोळवण केली, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते दिलीप लांडे यांनी अर्थसंकल्पीय भाषणाच्या वेळी केला. 

सत्ताधारी पक्षाने खोट्या वचननाम्याच्या आधारे पुन्हा मुंबईच्या जनतेची दिशाभूल करून सत्ता काबीज केली. वचननाम्यातील कोणत्याच योजनांचा पाठपुरावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत नाही. वर्षानुवर्षे मराठी जनतेच्या भावनेला आवाहन करून त्यांच्या मतांच्या जोरावर निवडून येणार्‍या सत्ताधारी पक्षाने वचननाम्यात मराठी साहित्य भवन उभारणार, महाराष्ट्रातील लोकजीवन आणि खाद्यपदार्थ यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र भवन उभारणार आणि रंगभवन उभारणार, अशी घोषणा करण्यात आली, मात्र त्याचे पुढे काय झाले असा सवालही त्यांनी या वेळी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages