मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी पारधी समाजातर्फे आझाद मैदानात मोर्चा तसेच जोरदार निदर्शने करण्यात आली. याबाबत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा पारधी मुक्ती आंदोलन या संघटनेतर्फे करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली. मात्र पारधी समाज आजही उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिला आहे. आजही हा समाज अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा शोधण्यासाठी भटकंती करत आहे. पारध्यांच्या योजना मात्र फक्त कागदावर अशी अवस्था झाली आहे. या समाजाला स्थिरता नसल्याने हा समाज शिक्षणापासून कोसो दूर आहे.पारधी जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला गेला असून, तो अधिकच गडद झाल्याचे पारधी मुक्ती आंदोलनाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रकाश वायदांडे यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने पारधी समाज अभ्यास आयोगाची स्थापना करावी. पारधी समाजाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात १00 कोटी रुपयांची तरतूद करावी, पारधी समाजावर होणार्या अन्यायाच्या चौकशीसाठी विशेष कक्ष स्थापन करावा, आदी आमच्या मागण्या असल्याचे वायदांडे यांचे म्हणणे आहे.
Post Top Ad
16 March 2013
Home
Unlabelled
पारधी समाज अभ्यास आयोगाची स्थापना करावी
पारधी समाज अभ्यास आयोगाची स्थापना करावी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment