नवी दिल्ली : विकासाच्या मार्गावर घोडदौड करणार्या भारतातील जवळपास सहा कोटी ऐंशी लाख लोक झोपडपट्टीत राहत असल्याचे सरकारने केलेल्या गणनेतून समोर आले आहे. भारत सरकारच्या महाप्रबंधकांनी हा अहवाल तयार केला आहे.
झोपडपट्टीत राहणारे जास्तीत जास्त लोक हे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील असल्याचे केंद्रीय गृहनिर्माण व नागरी गरिबी निर्मूलनमंत्री अजय माकन यांनी गुरुवारी सांगितले. झोपडपट्टीत राहणार्या एकूण लोकांपैकी ७१ टक्के लोक या राज्यांतील आहेत, असे त्यांनी सांगितले. मात्र सुविधांच्या बाबतीत बघायचे झाल्यास झोपडपट्टीमध्ये राहणार्या ९0 टक्के लोकांकडे वीज कनेक्शन असून यातील ७0 टक्के लोकांकडे स्वत:चा टीव्ही आहे, ७२.७ टक्के लोकांकडे दूरध्वनी आहे, तर १0.४ टक्के लोकांकडे लॅपटॉप किंवा संगणक असल्याचेही यातून समोर आले आहे. तसेच ७४ टक्के लोकांना नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळत असल्याचेही यात म्हटले आहे. यातील ६६ टक्के लोकांकडे शौचालय आहे, तर १८.९ टक्के लोक उघड्यावरच शौचाला जातात व १५.१ टक्के लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करत असल्याचे यात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment