जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इंडियन स्टुडन्ट ऑर्गनायझेशन व सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महिला अत्याचारांच्या विरोधात मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे क्याणडल मार्च काढला. यावेळी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आनंदा होवाळ यांनी देशाचा विकास घडवायचा असेल तर महिलांनी मुख्य प्रवाहात यावे लागेल असे आवाहन केले.
महामानवानी स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला व समतेचा लढा दिला. परंतु व्यवस्थेच्या विरोधात हा लढा देत असताना महामानवानी व्यवस्थेचा अभ्यास केला. महिलांनी सुद्धा हा लढा लढताना आद्यशिक्षिका सावित्रीमाईचा आदर्श घेत प्रचंड अभ्यास केला पाहिजे असे सांगितले. महिला दिन हा फक्त एक दिवस साजरा करण्याचा विषय नसून महिलांना सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रत्येक दिवस जागृती करण्याचा कार्यक्रम असल्याचे एसएनडीटी महाविद्यालयाच्या विद्या मोटे यांनी सांगितले.
या क्याणडल मार्चचे उद्घाटन भिक्कुनी संघप्रिया यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्चमध्ये नागपूर येथून आलेल्या भिक्कूणी संघ, सिध्दार्थ महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी दादासाहेब यादव, दिपक गायकवाड, विकास लाखन, सुजित केदारे, रोहित सकपाळ, सुप्रिया मोहिते, श्रुती पाळेकर, कमला खरटमल, कामला गजरे, पूजा भवड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित सकपाळ, स्वप्नील जाधव, नितीन कांबळे, हर्षद कांबळे, पंकज जाधव, आकाश आव्हाड, रुचीरा पाटील, सुप्रिया मोहिते या सिद्धार्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी विशेष मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment