बुधवारच्या स्थायी समिती बैठकीत सभागृह नेते यशोधर फणसे आणि भाजपा नगरसेवक मनोज कोटक यांनी वाहनतळ कंत्राटाबाबत सद्यस्थिती काय, अशी विचारणा केली असता गुप्ता यांनी हे स्पष्टीकरण करत महिला बचत गटांना वाहनतळ पार्किंगचे कंत्राट देण्याची जबाबदारी पालिकेची असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई पालिकेने दीड वर्षापूर्वी मुंबईतील पे अँण्ड पार्कच्या कंत्राटात ५0 टक्के महिला बचत गटांना तर ५0 टक्के सुशिक्षित बरोजगार तसेच शाहिदांच्या पत्नींना वाटा देण्याचे मंजूर केले होते. मात्र या निर्णयास एका मोठय़ा कं त्राटदाराने न्यायालयात आव्हान दिल्याने न्यायालयाकडून स्थगिती आल्याने हे घटक कंत्राटापासून वंचित राहिले. मात्र या कंत्राटदाराकडून वाहनतळांची जबाबदारी पालिका पेलू शकणार नाही, असा केलेला युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला. त्यानंतर या कंत्राटदाराने ३१ डिसेंबर रोजी 'ए' विभागातील ४७ वाहनतळ पालिके कडे हस्तांतरित केले. यामुळे पालिकेने या वाहनतळ वाटपाची निविदा प्रक्रिया सुरू केली असून न्यायालयाचा अंतिम निकाल येताच याबाबतच्या निविदा काढण्यात येतील, असे असिम गुप्ता यांनी सांगितले. तसेच न्यायालयाच्या निर्णयानंतर वाहनतळांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची भरती करण्यासाठीही निविदा काढण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment