मुंबई : शासनाकडून रेशनकार्ड धारकाच्या बँक खात्यात केरोसिन आणि गॅस सिलिंडरची सबसिडी जमा करण्याची योजना सुरू करण्यात येणार असल्याने शिधावाटप कार्यालयाकडून प्रत्येक रेशनकार्ड धारकांच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक रेशनकार्ड धारकाने लवकरात लवकर आपल्या विभागातील शिधावाटप कार्यालयात अथवा जवळच्या विशेष केंद्रावर जाऊन आपली संपूर्ण माहिती फॉर्मद्वारे भरून द्यावी, असे आवाहन शिधावाटप विभागाकडून करण्यात आले आहे.
शासनाने केरोसिन आणि गॅस सिलिंडरची सबसिडी (अनुदान) थेट रेशनकार्ड धारकाच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात शासनाच्या विविध योजनांतील अनुदान (सबसिडी) देखील ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिधावाटप विभागाने शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक रेशनकार्ड धारकांची माहिती संकलित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी शिधावाटप विभागाने सर्व परिमंडळ विभागातील रेशनिंग कार्यालयात तसेच वसाहतीमधील रेशनिंग दुकानाजवळ विशेष केंद्रे उघडली आहेत. या केंद्रांवर रेशनिंग निरीक्षकाच्या माध्यमातून फॉर्मद्वारे माहिती भरून घेतली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक रेशनकार्ड धारकाने आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन आपल्या बँक खात्यासह आधार क्रमांक आणि इतर माहिती भरून द्यावी, असे आवाहन शिधावाटप विभागाकडून करण्यात आले आहे.
या फॉर्मसह रेशनकार्डची झेरॉक्स प्रत, आधारकार्ड किंवा आधारकार्डच्या पोचपावतीची झेरॉक्स प्रत, गॅस ग्राहक कार्डची झेरॉक्स प्रत, बँक खाते पुस्तिकेची झेरॉक्स प्रत सोबत जोडणे आवश्यक असल्याची माहिती भांडुप विभागाच्या रेशनिंग अधिकारी के. व्ही. शानबाग यांनी दिली, मात्र हे बँक खाते कुटुंबातील महिला सदस्याच्या नावे अथवा कुटुंबप्रमुख आणि महिला सदस्य असे संयुक्त असणे आवश्यक असल्याचेही शानबाग यांनी सांगितले. याबाबतचे माहितीपत्रक तसेच नमुना अर्ज संकेतस्थळावर असून या संकेतस्थळावरून हा फॉर्म आणि माहितीपत्रक मोफत डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अथवा अधिक माहितीसाठी ई-परिमंडळ कार्यालय (२४१२५३५२/२४१२५४९५)भांडुप (२५९४७१२0), घाटकोपर (२१0२१४६८), माटुंगा (२४0९५८२८), मुलुंड (२५६१११९९), कुर्ला (२५२२९१३१), गोवंडी (२५५८00२४), चेंबूर (२५२२१५१५५५) आणि विक्रोळी (२५७८३७६५) आदी रेशनिंग कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
Post Top Ad
25 March 2013
Home
Unlabelled
शिधावाटप कार्यालयाकडून रेशनकार्ड धारकांना आवाहन
शिधावाटप कार्यालयाकडून रेशनकार्ड धारकांना आवाहन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment