दहा टक्के शुद्ध पाण्याची होणार बचत
मुंबई : मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पिण्यासाठी असलेले शुद्ध पाणी वाचवण्याच्या गरजेतून मुंबई महानगरपालिकेने 'ग्रे वॉटर बॉयलॉज' ही नवीन योजना आखली आहे. स्वयंपाकघरातील आणि स्नानगृहातील वापरलेल्या पाण्यावर पुनप्र्रक्रिया करून हे पाणी पुन्हा वापरात आणण्यात येणार आहे. या योजनेमुळे दहा टक्के शुद्ध पिण्याच्या पाण्याची बचत होणार असल्याचे पालिका उपायुक्त (अभियांत्रिकी) प्रकाश कदम यांनी सांगितले.
शुक्रवारी अभियांत्रिकी विभागाच्या सादरीकरण प्रसंगी कदम बोलत होते. पिण्याच्या पाण्याचा इतर कामांसाठी होणारा वापर कमी व्हावा, यासाठी ही योजना आणली जात असल्याचे कदम यांनी सांगितले. ग्रे वॉटर प्रकल्प बनवण्यासाठी प्रत्येक सोसायटीला सुमारे २0 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून नागरिकांच्या या प्रकल्पाबाबत सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी पालिकेकडून संकेतस्थळावर या प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्यात येईल. नागरिकांच्या सूचनांचा अभ्यास करून हा प्रस्ताव राबवण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

स्वयंपाकघर आणि स्नानगृहातील वापरलेल्या पाण्यावर कार्बन फिल्टरने पुनप्र्रक्रिया करणार्या प्रकल्पास ग्रे वॉटर प्रकल्प असे म्हटले जाते. पुनप्र्रक्रियेतून मिळणार्या पाण्याचा वापर बगिचा, शौचालये, गाड्या धुणे इत्यादीसाठी करता येऊ शकताे. यामुळे दररोज किमान साडेतीनशे दशलक्ष लिटर पाणी वाचेल, असे कदम यांनी सांगितले.ग्रे वॉटर प्रकल्प कोणाला बंधनकारक ग्रे वॉटर येणार्या सर्व नवीन इमारतींना बंधनकारक असणार आहे. तसेच दोन हजार स्वेअर मीटरवर बसणार्या आणि ६0 सदनिका असणार्या सर्व सोसायट्यांना हा प्रकल्प बंधनकारक असणार आहे. मुंबईत अनेक जुन्या सोसायट्या, चाळी असल्याने त्यांच्या आजूबाजूला जागा उपलब्ध नसल्याने यांना ही योजना लागू होणार नाही.
फायदेशीर प्रकल्प
मुंबईत सध्या प्रतिदिन ३४५0 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. पैकी १७00 दशलक्ष लिटर्स पाणी हे पिण्याव्यतिरिक्त इतर बाबींसाठी वापरले जाते. पालिकेच्या ग्रे वॉटर प्रकल्पामुळे या पाण्यावर प्रक्रिया होऊन पाणी इतर गोष्टींसाठी वापरल्याने पिण्याच्या पाण्याची मोठय़ा प्रमाणात बचत होईल.बाणगंगा येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र दक्षिण मुंबईतील बाणगंगा येथे पालिकेकडून सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे प्रस्तावित असून या प्रकल्पांतर्गत रिसायकलिंगद्वारे पाणी शुद्ध करून या पाण्याचा वापर राजभवनाच्या बगिच्यांसाठी वापरले जाणार आहे. या प्रक्रिया केंद्रामुळे दीड एमएलडी पाणी वाचणार आहे.

No comments:
Post a Comment