मुंबई : वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होत आले असतानाच कुलाबा-वांद्रे-सिप्झ या तिसर्या मेट्रो मार्गिकेसाठी आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी एमएमआरडीएने कंबर कसली आहे. सोमवारी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रालयाच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डने येत्या काही दिवसात तिसर्या मेट्रो मार्गाबाबत सकारात्मक पावले उचलण्याची तयारी दर्शविल्याचे एमएमआरडीएतील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. पहिल्या मेट्रो मार्गिकेनंतर चारकोप-वांद्रे-मानखुर्द हा प्रकल्प मार्गी लागेल अशी अपेक्षा होती,मात्र या प्रकल्पातील वाढत्या समस्यांमुळे हा प्रकल्प बारगळणार असल्याचे या अर्थसंकल्पातील गुंतवणुकीमुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात घसघशीत रकमेची भर पडलेल्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ या तिसर्या मेट्रो मार्गिकेचे काम मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. सोमवारी एमएमआरडीए आयुक्त यू. पी. एस. मदान आणि अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे मेट्रो ३ मार्गिकेसंदर्भात एक बैठक पार पडली. पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड आणि एमएमआरडीएच्या बैठकीत काही मुद्दे उपस्थित करण्यात आले, त्यावर उत्तरे दिल्यावर हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा प्रकल्प वेग घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Post Top Ad
26 March 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment