पे अँण्ड पार्कच्या नवीन कार्यपद्धतीला मंजुरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 March 2013

पे अँण्ड पार्कच्या नवीन कार्यपद्धतीला मंजुरी


मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे देण्यात येणार्‍या पे अँण्ड पार्कच्या कंत्राटदारांकडून मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेब तत्त्वावर आधारित पार्किंग व्यवस्था ही कार्यपद्धती अमलात आणण्याबाबत गुरुवारी स्थायी समितीत सादरीकरण केले गेले. या वेळी अनेक सदस्यांनी पे अँण्ड पार्कचे केलेले धोरण प्रथम अमलात आणा नंतर या कार्यपद्धतीसाठी मंजुरी घ्या, अशी मागणी केली. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी पे अँण्ड पार्क बाबतचे धोरण कोणतेही लागू केले तरी ही कार्यपद्धती वापरणे का महत्त्वाचे आहे हे समजावून सांगितल्यानंतर हे धोरण स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मंजूर केले. 

या नवीन कार्यपद्धतीबाबत स्पष्टीकरण करताना अतिरिक्त आयुक्त असिम गुप्ता यांनी याबाबतचे उद्देश सांगितले. यामध्ये पे अँण्ड पार्क पारदर्शक करणे, पालिके चा महसूल वाढविणे, वाहनतळावरील व्यवस्था लोकाभिमुख करणे तसेच अधिक चांगल्या रीतीने देखभाल करणे हे उद्देश असल्याचे सांगितले. या संगणकीय कार्यपद्धतीमुळे अवैध चलनावर आळा बसेल, असे गुप्ता यांनी सांगितले. तसेच यामुळे अधिक रोजगार निर्मिती होईल, प्रत्येक वाहनतळासाठी ताळेबंद महसूल उपलब्ध होईल, लोकांकरिता घरबसल्या इंटरनेटद्वारे उपलब्ध पार्किंगची माहिती उपलब्ध होईल तसेच नेटवरून आगाऊ पार्किं ग बुकिंग करणे शक्य होईल, सामाजिक एकोपा वाढविण्यास मदत होईल, असे गुप्ता यांनी सांगितले. 

या पे अँण्ड पार्कची कंत्राटे उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दिली जातील, यामध्ये नवीन टेंडरनुसार फक्त चालविणार्‍यांसाठी पैसे दिले जाणार असून कं त्राटदारानेच सिक्युरिटी आणि व्यवस्था सांभाळायची असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले. 

पे अँण्ड पार्कमध्ये नेहमी वाहने पार्क करणार्‍यांना पार्किंग कार्ड दिले जाणार असून त्यातून त्यांचे पैसे वजा होतील. या वेळी गाडीच्या नंबरबरोबर गाडीच्या मेकचीही नोंद होणार असून गाडी किती तास उभी राहाते, किती भाडे होईल हे संगणकाद्वारे ठरविले जाईल. त्यामुळे कोणालाही अधिक पैसे उकळता येणार नाहीत. तसेच गाडी कुठे कुठे पार्क होती हे कळेल व चोरी झाल्यासही त्यांची माहिती मिळेल, काही इमारतींबाहेर पार्किं गची व्यवस्था नसल्याने त्या त्या ठिकाणी रेसिडन्स परमीटही दिले जाणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. सध्या पालिकेक डे ९३ पे अँण्ड पार्क असून याबरोबर इतर उपलब्ध होणार्‍या जागेवरही पार्किंगची व्यवस्था करता येईल. ही सिस्टीम आणली तर ९३ वरून ही संख्या ४00 ते ५00 वर जाईल, असे सांगत गुप्ता यांनी पार्किंगचा अधिकार पालिकेचाच असल्याचे या वेळी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad