मुंबई - प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम द्यावी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापकांना नेट-सेट मुक्ततेच्या दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील प्राध्यापकांनी पुकारलेले आंदोलन आज चांगलेच पेटले. हजारो प्राध्यापकांची रस्त्यावर उतरून जेलभरो करत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. सहा वायरलेसमध्ये भरून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी ‘गो बॅक, गो बॅक, राजेश टोपे गो बॅक’ आणि ‘टोपी लावली टोपी लावली, टोपेंनी टोपी लावली’ अशा घोषणांनी संपूर्ण फोर्ट परिसर दणाणून गेला.
जोपर्यंत या दोन प्रमुख मागण्यांसह १३ मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत विद्यापीठीय परीक्षांवर बहिष्कार कायम राहणार असल्याचा निर्धार या प्राध्यापकांनी व्यक्त केला. नांदेड आणि संभाजीनगर हे दोन जिल्हे दुष्काळग्रस्त असल्याने या दोनच जिल्ह्यांत प्राद्यापक परीक्षेच्या कामकाजात सहभागी होतील. मात्र उर्वरित ठिकाणी असहकार राहील.
No comments:
Post a Comment