गेल्या तीन वर्षांत लष्कर, वायुसेना व नौदलातील तब्बल ३६८ जवानांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तसेच ७८२ जवानांनी स्वेच्छानवृत्ती घेतली असल्याचे संरक्षणमंत्री ए. के. अँण्टोनी यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले.
२0१0 मध्ये लष्करातील ११५, नौदलातील एक आणि वायुदलातील १४, या व्यतिरिक्त २0११ मध्ये लष्करातील १0२, नौदलातील ४ आणि वायुदलातील २३ जवानांनी आपली जीवनयात्रा संपविली. २0१0 आणि २0११ पाठोपाठ २0१२ मध्येदेखील १0९ जवानांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. त्यात लष्करातील ९३, नौदलातील एक आणि वायुदलातील १५ जवानांचा समावेश आहे. एवढेच नाही तर गेल्या तीन वर्षांत ७८२ जवानांनी स्वेच्छानवृत्ती घेतली असून, त्यात २0१0 मध्ये २६५, २0११ मध्ये २८८ आणि २0१२ मध्ये २३९ जवानांचा समावेश असल्याची माहितीदेखील संरक्षणमंत्री ए. के. अँण्टोनी यांनी दिली.
No comments:
Post a Comment