कुर्ला टर्मिनस येथे दोन लाखांचा गुटखा जप्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 March 2013

कुर्ला टर्मिनस येथे दोन लाखांचा गुटखा जप्त


मुंबई : राज्यात गुटखा विक्रीस बंदी असताना परराज्यातून मोठय़ा प्रमाणावर गुटख्याची आवक सुरू आहे. कुर्ला टर्मिनस येथे शुक्रवारी दुपारी गोरखपूर एक्स्प्रेक्समधून आलेला २ लाखांचा गुटखा रेल्वे आरपीएफने जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात जप्त करण्यात आलेला गुटखा देण्यात आला आहे.

कुर्ला टर्मिनस येथे गोररखपूर एक्स्प्रेक्स २१४१ मधून आलेला माल उतरवण्याचे काम गुरुवारी सकाळपासून सुरू होते. या वेळी मजदुरांना काही संशयास्पद गोण्या आढळून आल्या.याबाबतची तक्रार आरपीएफला करण्यात आली. त्यानुसार या गोण्या घेण्यासाठी कोणी पुढे येईल या शंकेने आरपीएफच्या अधिकार्‍यांनी या गोण्यावर 'वॉच' ठेवला.मात्र गोणीतील माल घेण्यास कोणीही पुढे येत नसल्यामुळे अखेर अन्न व औषध प्रशासनाच्या समोर गोणीतील माल बाहेर काढण्यात आला. त्या वेळी या गोण्यांमध्ये राजश्री कंपनीचा जवळपास ४२ ते ४0 गोण्यांमध्ये ४00 किलो गुटखा आढळून आला आहे.आरपीएफ व.पो.नि. एच. एस. बर्वे, हेड कॉन्स्टेबल विशाल पाटील, विजय आमंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad