मुंबई - मुंबईत भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. या कुत्र्यांकडून होणारे हल्ले दरवर्षी वाढत असल्याच्या तक्रारींवरून मुंबई महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी अभ्यास गट नेमला आहे.
भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांना ठार मारण्याची परवानगी नसल्याने त्यांचे निर्बिजीकरण करून सोडून दिले जाते. 2007 मध्ये केलेल्या गणनेत मुंबईत 75 हजार भटके कुत्रे असल्याची नोंद आहे. या कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात येते. त्यामुळे 2007 पासून आजतागायत एक लाख 59 हजार भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. त्यानंतरही कुत्र्यांची संख्या वेगाने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईकरांना विशेषता रात्री रस्त्यावरून फिरणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी ते अधिकच हिंसक होत असल्याने जीव मुठीत घेऊनच चालावे लागते, अशी मुंबईकरांची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेने अभ्यास गट (स्ट्रे डॉग्ज स्टडी ग्रुप) नेमला आहे. या अभ्यास गटाचे अध्यक्ष पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक आहेत. या गटाच्या सूचना व शिफारशींवर विचार केला जाईल, असे आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले.
भटक्या कुत्र्यांची दहशत
वर्ष जखमी नगारिक मृत
2007 54,661 31
2008 62,763 14
2009 77,652 18
2010 77,484 14
2011 80,889 06
2012 82,274 08
2013 7,716 02
भटक्या कुत्र्यांची दहशत
वर्ष जखमी नगारिक मृत
2007 54,661 31
2008 62,763 14
2009 77,652 18
2010 77,484 14
2011 80,889 06
2012 82,274 08
2013 7,716 02
No comments:
Post a Comment