" जनकल्याणी " योजनेद्वारे महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण व्हावे - अंजली भागवत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 March 2013

" जनकल्याणी " योजनेद्वारे महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण व्हावे - अंजली भागवत


मुंबई :  http://jpnnews.webs.com
महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरणाच्या उद्देशाने महिलांसाठी " जनकल्याणी " योजनेचे उद्घाटन सुप्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते 

जनकल्याण सहकारी बँकेची 'जनकल्याणी योजना' कर्तृत्ववान स्त्री शक्तीला पाठबळ देणारी आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहचावा, असे आवाहन अंजली भागवत यांनी केले आहे. कुटुंबातील महिलांना आर्थिक बचतीचे महत्त्व कळले तर सर्व घरातील व्यक्तींना त्याचा लाभ होईल. खेडोपाड्यात बँकेबाबत माहिती नसणार्‍यांपर्यंत ही योजना पोहचल्यास महिलांचे कल्याण होईल, असे भागवत म्हणाल्या.

जनकल्याण योजनेंतर्गत महिलांचे ५00 रुपयांत बचत खाते उघडण्यात येणार आहे. त्यासोबत महिलेच्या दोन मुलांची खाती मोफत सुरू करण्यात येणार आहेत. तसेच या खात्याबरोबर बचतीचे महत्त्वही पटवून देण्यात येणार आहे. तसेच एटीएम आणि चेकबुक सेवाही देण्यात येणार असल्याची माहिती जनकल्याण बँकेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad