सोलापूरच्या पाण्याला आग / शेतकर्‍यांचा फाशी लावून आत्महत्येचा प्रयत्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 March 2013

सोलापूरच्या पाण्याला आग / शेतकर्‍यांचा फाशी लावून आत्महत्येचा प्रयत्न


मुंब ई- पुण्याच्या कोणत्याही धरणाचे पाणी उजनी धरणात सोडून उजव्या आणि डाव्या कालव्यात सोडावे या मागणीसाठी महिनाभर आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या सोलापूरच्या शेतकर्‍यांचा बांध आज फुटला. उपोषणाला बसलेल्या शेतकर्‍यांपैकी तिघा शेतकर्‍यांनी आझाद मैदानातील झाडाला साडी बांधून गळफास लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दलाची चांगलीच धावपळ उडाली.

उपोषण केले, घागर मोर्चा काढला आणि मंत्रालयात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न केला तरी राज्य सरकार लक्ष देत नसल्याने सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली उपोषण करणारे जयप्रकाश मोरे, अमर देशमुख आणि विकास जाधव या तिघा शेतकर्‍यांनी आझाद मैदानातील झाडावर चढून फाशी घेण्याचा प्रयत्न केला. शेतकरी फाशी घेत असल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडी लावून झाडावर चढण्याचा प्रयत्न करून या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला या तिघांनी दाद दिली नाही. उपोषणकर्त्या महिलांनीही जवानांना मज्जाव केला. तासभर हे नाट्य सुरू होते. अखेर बाजूलाच आंदोलन करणार्‍या समाजसेविका मेधा पाटकर यांनी मध्यस्थी करून या तिघांना झाडावरून खाली उतरविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या फाशीची पूर्वकल्पना पोलीस व राज्य सरकारला दिली होती, असा दावा संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केला

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad