मुंबई : उपनगरीय रेल्वेवर ऐन गर्दीच्या वेळी धावत्या दादर-ठाणे लोकलमधून आठ प्रवासी पडल्याची घटना सायन रेल्वे स्थानकाजवळ रात्री आठच्या सुमारास घडली. कुर्ल्यावरून सीएसटीकडे जाणार्या विरुद्ध दिशेच्या लोकलमधून प्रवाशाने पावडर फेकल्याने दरवाजात उभे असलेले प्रवासी पडल्याचे सांगण्यात आले. त्यातील जी. नित्यानंद (२६) या तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर आहेत. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेत जखमी झालेल्या सहा प्रवाशांना उपचारांसाठी सायन रुग्णालयात तर दोघांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील जी. नित्यानंद या प्रवाशाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. अखिलेश गुप्ता (२४), सुशांत भोर (२0), दीपक (३0), श्रीनिवास (३२) आणि लक्ष्मण त्रिमुख अशी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची नावे आहेत, तर भाभा रुग्णालयात चेंबूर येथे राहणारी कविता परमार आणि भांडुप येथील दिनेश मोरे यांना दाखल करण्यात आले आहे.
दादरवरून ठाण्याला जाणारी ही गाडी प्रवाशांच्या गर्दीने तुडुंब भरलेली होती. या लोकलने रात्री आठच्या सुमारास सायन स्थानक सोडले. त्याच वेळी कुर्ल्याहून सीएसटीला जाणारी दुसरी धिमी लोकल शेजारच्या मार्गावरून जात होती. त्या लोकलमधून ठाण्याला जाणार्या लोकलवर एका प्रवाशाने पावडर फेकली. ही पावडर एका प्रवाशाच्या डोळ्य़ात गेली. या अचानक घडलेल्या घटनेने तो गोंधळला आणि त्याचा तोल गेला. त्याचा धक्का लागून दरवाजाजवळील इतर प्रवाशांचा आधाराचा हात सुटला. या प्रयत्नात दरवाजावर दाटीवाटीने उभे असलेले सर्व प्रवासी तोल जाऊन खाली पडले. इतर प्रवाशांना लगेचच आरडाओरड करत लोकल थांबवली. होळीच्या पूर्वसंध्येला हा प्रकार घडल्याने हळहळ व काळजीचा सूर व्यक्त होत आहे.
Post Top Ad
26 March 2013
Home
Unlabelled
पावडर फेकल्याने सायनजवळ लोकलमधून ८ जण पडले एकाचा मृत्यू
पावडर फेकल्याने सायनजवळ लोकलमधून ८ जण पडले एकाचा मृत्यू
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment