बौद्ध धर्मियांच्या आर्थिक, सामाजिक आत्मसन्मानासाठी बौद्ध कायद्याची गरज असून त्यासाठी लढा उभारायला पाहिजे असे मत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती सी.एल. थूल यांनी बुद्धीस्ट मिशन द्वारे मुंबई मराठी पत्रकार संघ येथे " बौद्धांसाठी बौद्ध कायद्याची गरज " या विषयावर बोलताना व्यक्त केले.
बुद्धीस्ट मिशनच्या स्मरणिकेचे उद्घाटन थूल यांच्या हस्ते झाल्यानंतर बोलताना ११८० पासून बौद्धांच्या चाली रिती विवाह याबाबत लिखाणाद्वारे माहिती मिळते यावरून त्या काळातील चालीरिती काय व कश्या होत्या त्यात कोणते बदल होत गेले याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे थूल यांनी सांगितले. आपण रामायण महाभारताला ते काल्पनिक असल्यामुळे विरोध करतो मग काल्पनिक असलेल्या जातक कथा का स्वीकारतो असा प्रश्न थूल यांनी उपस्थित केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या कलम ४४ मध्ये सर्वांसाठी समान नागरी कायदा असावा असे म्हंटले असले तरी वेळे नूसार व काळा नूसार त्यामध्ये संशोधन करावे असे म्हटले आहे. भारतात पारशी, आर्य, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन यांचे कायदे आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा मध्ये हिंदू धर्माला मानणार नाही असे म्हटले आहे. यामुळे बौद्धांना त्यांचा वेगळा कायदा असावा असे थूल यांनी स्पष्ट केले आहे.
बौद्धांसाठी वेगळा कायदा असावा यासाठी २००७ मध्ये चंद्रकांत हंडोरे सामाजिक न्याय मंत्री असताना बैठक बोलावण्यात आली होती. यानंतर डॉ. नितीन राऊत व जोगेंद्र कवाडे यांनी नागपूरच्या विधान भवनासमोर सत्याग्रह केला होता. परंतू मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती केल्या नंतर बौद्ध कायद्याचा एक मसुदा तयार करण्यात आला होता यामध्ये विवाह व वारसाहक्क याच बाबींचा समावेष होता नंतर या मसुद्यात दत्तक, घटस्फोट, पत्नीचे हक्क यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती थूल यांनी दिली.
२० मे २०१२ ला तत्कालीन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्याकडे मंत्री डॉ. नितीन राऊत यांची बैठक झाली असता भारतातील एकूण बौद्धांपैकी ६५ टक्के बौद्ध फक्त महारष्ट्रामध्ये राहत असल्याने बौद्ध कायद्याबाबत मागणीचा विचार करून मसुदा कमिटी तयार करण्यात आली. परंतू कमिटीची एकही बैठक झाली नसल्याची खंत थूल यांनी व्यक्त केली. बौद्धांसाठी चांगला कायदा बनवावा यासाठी चर्चा करत बसण्यापेक्षा लोकांनी याबाबत सूचना पाठवण्याचे आवाहन थूल यांनी केले. यावेळी साहित्यिक सचित तासगावकर, लक्षमण भगत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले
No comments:
Post a Comment