सुरक्षा दलातील १ हजार रिक्त पदे भरणार - आयुक्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 March 2013

सुरक्षा दलातील १ हजार रिक्त पदे भरणार - आयुक्त


मुंबई : मनपाच्या मालमत्तेचे रक्षण करणार्‍या सुरक्षा दलातील १ हजार रिक्त पदे लवकरच भरली जाणार असल्याचे आश्‍वासन आयुक्त सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी दिले. सुरक्षा दलाच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त भांडुप संकुलातील सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आयुक्त बोलत होते.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव, जलवाहिन्या, जलाशयांच्या सुरक्षा आणि इतर मनपाच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी या सुरक्षा दलाच्या हाती आहे. रिक्त पदे भरण्याबरोबरच प्रशिक्षण आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी या वेळी सांगितले. हैदराबाद शहरातील बॉम्बस्फोट आणि तसेच मुंबईला असलेला दहशतवाद्यांचा धोका लक्षात घेता मुंबई पोलिसांच्या सहकार्याने पालिका सुरक्षा दलातील सुमारे तीन हजार सुरक्षा रक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी या वेळी सांगितले. संचालनात उत्कृष्ट प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सहाय्यक सुरेखा अधिकारी, विलास सुर्वे यांच्या प्लॅटूनला देण्यात आले.या वेळी सुरक्षा दलातील जवान आणि अधिकार्‍यांचा आयुक्त आणि त्यांच्या पत्नी अश्‍विनी कुंटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सुरक्षा दलातील जवानांनी घुमर नृत्य, भांगडा नृत्य सादर केले. तसेच चंद्रकांत नारायणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कराटेचे प्रात्यक्षिक सादर केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad