मुंबई- ४०० चौरस फुटांच्या घराच्या मागणीसाठी धारावीकरांनी आता आंदोलन तीव्र केले असून ९ एप्रिलला धारावी बंदची हाक दिली आहे. धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून धारावीकरांनी उत्स्फूर्तपणे धारावी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
धारावी पुनर्विकासाअंतर्गत ३०० चौरस फुटांचे घर देण्यात येणार असून धारावीकरांकडून ४०० चौरस फुटांच्या घराची मागणी होत आहे. मात्र या मागणीकडे दडपशाहीचा वापर करीत धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. मात्र हा डाव हाणून पाडीत ४०० चौरस फुटांचे घर मिळविण्यासाठी धारावी बचाव आंदोलनाअंतर्गत सर्वपक्षीय नेत्यांनी गेल्या महिनाभरापासून आंदोलन तीव्र केले आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवार, २५ मार्चला धारावीत कार्यकर्त्यांची जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत ‘धारावी बंद’ची हाक देण्यात आली. धारावीकर या बंदमध्ये सहभागी होणार असून सायंकाळी ४ वाजता संत रोहिदास मार्ग येथे जाहीर सभा होणार आहे.
Post Top Ad
28 March 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment