मुंबई : मंत्रालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या इमारतीचा विमा काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
डॉ. नीलम गोर्हे यांनी मंत्रालयाच्या आगींच्या अनुषंगाने केल्या जाणार्या उपाययोजनांचा विषय अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. २१ जून २0१२ रोजी मंत्रालयाला आग लागल्यानंतर एक ऑगस्टच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रालयाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी ८१.६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर १४ जानेवारी २0१३ रोजी पुन्हा मंत्रालयाला लाग लागली. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाचा विमा काढला आहे का? सर्किट ब्रेकर असतानाही आग कशी लागली? ती शॉर्टसर्किटमुळे लागली हे खरे आहे का? मंत्रालयात आग प्रतिबंधक कक्ष आहे का? फाईल्सच्या पुनरुज्जीवनाबाबत तसेच सुरक्षिततेबाबत कोणती उपाययोजना केली? अशा प्रश्नांची सरबत्ती डॉ. गोर्हे यांनी केली. चर्चेला उत्तर देताना रणजित कांबळे यांनी, मंत्रालयाच्या इमारतीचा विमा काढलेला नसून नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या इमारतीचा विमा काढला जाईल, असे सांगितले. मंत्रालयात भिंतींच्या आतून पाण्याचे ठिबक व्हावे अशी यंत्रणा तेथे तयार करण्यात येत आहे. प्लायवूडच्या जागी सिपोरेक्सचे ब्लॉक्स, संबोधन करता येईल अशी ध्वनी व्यवस्था, अंधार व धुरातही जिन्यांचा रस्ता दिसेल अशी रिप-लेक्ट्र्स, फायरप्रूफ दरवाजे आदी व्यवस्था करण्यात येत आहे, असेही कांबळे यांनी सांगितले.
Post Top Ad
23 March 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment