शेतकर्‍यांना पेन्शन देण्याची जनता दलाची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 March 2013

शेतकर्‍यांना पेन्शन देण्याची जनता दलाची मागणी

मुंबई / (  http://jpnnews.webs.com )
राज्यातील ६0 वर्षांवरील सर्व शेतकर्‍यांना दरमाह किमान दोन हजार रुपये पेन्शन मिळावी, यासाठी जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्रच्या वतीने बुधवारी आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्यात आले. संपूर्ण राज्यभर चालवलेल्या मोहिमेत एक लाखाहून अधिक शेतकर्‍यांचे अर्ज भरून घेतले आहेत, अशी माहिती या वेळी जनता दलाचे प्रधान महासचिव प्रताप होगाडे यांनी दिली. संपूर्ण जगामध्ये अन्न सुरक्षा हा सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न मानला गेला आहे. अन्न सुरक्षेचा महत्त्वाचा घटक शेतकरी आहे. आज हा घटक दयनीय अवस्थेत आहे. गेल्या १७ वर्षांत २ लाख ७१ हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ६0 वर्षांवरील सर्व शेतकर्‍यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी पेन्शनची गरज आहे. असे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad