मुंबई / अजेयकुमार जाधव ( http://jpnnews.webs. com )
गोरेगावच्या पालिका वसाहतीत राहणाऱ्या एका १४ वर्षीय दलित मुलीचा नंदादीप विद्यालयामध्ये विनयभंग झाला असला तरी पोलिसांकडून अद्याप अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती उघड झाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार सदर विद्यार्थिनी समाजवादी विचारांच्या सुकन्या सामंत यांच्या नंदादीप विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. १९ जानेवारी २०१३ ला आपला परीक्षेचा पापर लवकर सोडवून खाली तळ मजल्यावर हि विद्यार्थिनी बसली असताना शाळेच्या वॉचमन तिवारी याने जवळ येवून " भूक लगी है क्या, आपको खान चाहिये क्या" असे विचारले. यावर सदर विद्यार्थिनीने खायला द्या असे बोलले असता वॉचमन तिवारी याने " अंदर रूम मे चलो, अंदर डिब्बा रखा है" असे सांगितले.
वॉचमन तिवारी याने सदर विद्यार्थिनीला शिक्षकांसाठी असलेल्या मिटिंग रूम मध्ये नेवून कुरमुरे दिले व पाठी मागून येवून मिठी मारून " बेटा मुझे एक पप्पी दो " असे म्हटले असता सदर विद्यार्थिनीने घाबरून जाऊन त्या ठिकाणाहून पळ काढून झालेला प्रकार वर्ग शिक्षिका दीपा कदम व मुख्याध्यापिका श्रद्धा प्रभू खानोलकर यांना सांगितला असता मुख्याध्यापिकेने या पराकार्नाची माहिती पोलिसांना देण्याचे टाळून सदर विद्यार्थिनीलाच हि गोष्ट कोणालाही सांगू नको असे सांगितले.
यापूर्वीही याच वॉचमनने सदर विद्यार्थिनीच्या खांद्यावर हात ठेवला होता. त्यानंतर पुन्हा असा प्रकार झाल्याने आपल्या आई वडिलांना घडलेल्या प्रकारची माहिती स्थानिक वनराई पोलिस ठाण्याला दिली असता ११ दिवसांनी ३० जानेवारीला ( २९ / १३ ) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परंतू एका दलित व जातीने हिंदू महार असलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाला असला तरी गोरेगावच्या वनराई पोलिस ठाण्याने अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवलेला नाही.
तसेच हि विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याने बाललैगिक गुन्हे प्रतिबंधक कायदा २०१२ च्या कलम २१ अन्वये या प्रकरणात हलगर्जी पण करणाऱ्या मुख्याध्यापिकेवर सुद्धा अद्याप कारवाही केलेली नसल्याने विद्यार्थिनीच्या वडिलांनी ५ मार्च रोजी वनराई पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पत्र देवून अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्या अंतर्गत तसेच बाल लैगिक शोषण गुन्हे कलम २१ अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान याबाबत अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्या अंतर्गत कारवाई न केल्यास ८ मार्च रोजी " महिला दिनी " पोलिस ठाण्यावर विविध दलित संघटना व रिपब्लिकन पक्षा द्वारे मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment