राज्यात २०१२ या वर्षात बलात्काराच्या एक हजार ७०४ घटना घडल्या असून , त्यापैकी अल्पवयीन मुलींवर ९२४ बलात्कार झाले आहेत , अशी धक्कादायक माहिती विधानसभेतील लेखी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तराच्या निमित्ताने उघड झाली आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न अनिल कदम , अमीन पटेल या आमदारांनी विचारला होता. त्याला गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती पुढे आली आहे. राज्यातील २००५ ते २०११ या कालावधीत बलात्काराच्या एकूण दहा हजार ८३७ घटना घडल्या आहेत. २०१२ अखेर न्यायालयात बलात्काराची १४ हजार ४१४ , विनयभंगाची ३१ हजार ४१२ ; तर छेडछाडीची ९ हजार ४८० प्रकरणे प्रलंबित असल्याची माहितीही या उत्तरात देण्यात आली.
Post Top Ad
20 March 2013
Home
Unlabelled
अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या ९२४ घटना
अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या ९२४ घटना
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment