मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील विशेष समित्यांच्या अभ्यास दौर्यांचा हंगाम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्थापत्य समिती (शहर) आणि स्थापत्य समिती उपनगरे या दोन्ही समिती सदस्यांचा अभ्यास दौरा बंगळुरू,म्हैसूर, उटी या ठिकाणी जाणार आहे. यापूर्वी महिला आणि बालकल्याण समिती आणि शिक्षण समितीचा अभ्यास दौरा केरळ येथे गेला होता, तर सुधार समितीचा अभ्यास दौरा गुजरात येथे गेला आहे. दरम्यान, या दौर्यांनंतर तेथील अभ्यासाची अंमलबजावणी मुंबईत केली जात नसल्याचेच वेळोवेळी दिसून आले आहे. या दौर्यांसाठी पालिकेकडून लाखो रुपये दरवर्षी खर्च केले जातात, मात्र अभ्यास दौर्यानंतर तेथे पालिकेला सोयीसुविधा किंवा इतर महत्त्वाच्या योजनांचे मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईसाठी कधीही अंमलबजावणी झाल्याचे दिसले नाही. याचा अर्थ हे अभ्यास दौरे केवळ पर्यटनासाठी आयोजित केले जातात, हे यातून स्पष्ट होत आहे. स्थापत्य समितीचे अभ्यास दौरे म्हैसूर, बंगळुरू, उटी येथे जाणार असून या अभ्यास दौर्यात समिती सदस्य व्यवस्थापन, तेथील कार्यपद्धती, रस्ते-पदपथांची बांधणी, उद्यान आणि दत्तकवस्ती योजना, गलिच्छ वस्त्यांचे नियोजन या विषयांचा अभ्यास करणार आहे.
Post Top Ad
06 March 2013
Home
Unlabelled
स्थापत्य समित्यांचा अभ्यास दौरा निकामी
स्थापत्य समित्यांचा अभ्यास दौरा निकामी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment