मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळ असतानाही ऐरोली येथील कार्यक्रमाच्या वेळी लाखो लिटर पाण्याची नासाडी करणार्या आसाराम बापू यांचा निषेध करणार्या आरपीआय कार्यकर्त्यांना तसेच धुळवडीचे चित्रण करणार्या पत्रकार आणि छायाचित्रकारांवर सोमवारी दुपारी आसाराम बापूंच्या सर्मथकांनी हल्ला करण्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. या मारहाणीत मीडियाचे पत्रकार व छायाचित्रकार किरकोळ जखमी झाले आहेत या प्रकरणाचा जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे मुंबई अध्यक्ष अजेयकुमार जाधव यांनी जाहीर निषेध केला आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आसाराम बापू व त्यांच्या कार्यकर्त्यांवर त्वरित कडक कारवाई करावी असे आवाहन जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आले आहे.
आसाराम बापू यांचा ऐरोली येथे दुपारी तीन वाजता सत्संग सुरू होता. या वेळी काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आसाराम बापूंच्या रंगपंचमीच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला. राज्यात दुष्काळ असताना अशा प्रकारे पाण्याची उधळपट्टी करू नये, असे सांगत त्यांनी बापूंच्या विरोधात घोषणा देत सत्संगमध्ये घुसण्याचा प्रय▪केला. या वेळी बापूंचे कार्यकर्ते व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. याचे चित्रीकरण करण्यासाठी छायाचित्रकार सरसावले. त्या वेळी बापूंचे सर्मथक मीडियाशी देखील बाचाबाची करीत होते. मीडियाच्या वृत्तांकन करण्यास मनाई करीत सर्वांना या ठिकाणावरून जाण्यास सांगण्यात आले. मात्र मीडियाचे छायाचित्रकार आणि पत्रकार हलत नाहीत हे पाहून आसाराम बापूंचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी मीडियाच्या लोकांचा पाठलाग करून त्यांच्यावर दगडफेक केली.
No comments:
Post a Comment