शिल्लक निधी नगरसेवक पुढील वर्षी वापरणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 March 2013

शिल्लक निधी नगरसेवक पुढील वर्षी वापरणार


मुंबई : लेखा नियमानुसार चालू वर्षी खर्च न पडलेली रक्कम किंवा शिल्लक असलेला निधी ३१ मार्च रोजी व्यापगत किंवा लॅप्स होतो, त्यामुळे तो पुढील वर्षी वापरता येत नाही. मात्र सन २0१२-१३ मध्ये घडलेल्या सर्व घटनांचा आढावा घेता एक विशेष बाब म्हणून काही अटींवर नगरसेवकांना यावर्षीचा नगरसेवक निधी पुढील वर्षी वापरण्यासाठी पालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

प्रभाग समिती निधीमधून आणि नगरसेवक निधीमधून पार पडावयाच्या कामांसाठी उपलब्ध असलेली तरतूद ३१ मार्च २0१३ पर्यंत पूर्णपणे वापरली जाऊ शकणार नाही. यास्तव सदरच्या अर्थसंकल्पीय तरतुदीचा शिक्षक निधी पुढील वर्षी वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी केली होती.चालू वर्षी पालिका स्तरावर अर्थसंकल्प मंजूर करण्यामध्ये जून महिना उजाडला. तसेच विभागवार सीडब्ल्युसी कंत्राटदार पद्धती सप्टेंबर २0१२ पर्यंतच उपलब्ध होती; परंतु त्यानंतर ई-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात आला. मात्र ही नवीन पद्धत स्थिरस्थावर होऊन प्रत्यक्ष कामे सुरू होण्यास उशीर झाला. तसेच बाजारात रेतीचा तुटवडा असल्यामुळे दिलेली कामे प्रत्यक्षात वेळेवर सुरू होऊ शकलेली नाहीत. यामुळे नगरसेवक निधी व्यपगत अर्थात लॅप्स होऊ नये आणि ही निधी लोकपोयोगी कामांसाठी उपलब्ध व्हावा यासाठी पुढील वर्षी हा निधी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती महापौर सुनील प्रभु, सभागृह नेता यशोधर फणसे, विरोधी पक्षनेता ज्ञानराज निकम, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे आणि सर्व नगरसेवकांनी केली होती.

ज्या कामांचे कार्यादेश १६ मार्च २0१३ पूर्वी दिले आहेत अशा कार्यादेशातील कामे पूर्ण झाली तरी देयके ३१ मार्च २0१३ पूर्वी सादर करता येऊ शकणार नाहीत. त्याच कार्यादेशातील तेवढीच रक्कम पुढील वर्षी २0१३-१४ मध्ये ३0 मेपर्यंत अधिदानासाठी उपलब्ध असणार आहे. अशा १६ मार्च २0१३ पर्यंत दिलेल्या कामाची देयके २५ मे २0१३ पर्यंत सर्व बाबींची पूर्तता करूनच संबंधित लेखा विभागाकडे अधिदानासाठी पाठवणे आवश्यक राहणार आहे. अशा कामांची देयके दिलेल्या निधीमधूनच ३0 मेपर्यंत अधिदानित करता येणार आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad