मुंबई : मुंबईत आपली छबी सर्वसामान्यांसमोर झळकवण्यासाठी झटणार्या लहान-थोर राजकीय नेत्यांच्या बॅनरबाजीला चाप लावण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सणांच्या निमित्ताने मोठमोठे पोस्टर, बॅनर लावून मुंबईचे विद्रुपीकरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पालिका प्रशासनाकडून कडक धोरण राबवले जाणार असून, सण-उत्सव साजरे होत असलेल्या मंडपांच्या १00 मीटर परिसरातच राजकीय-सामाजिक बॅनर, होर्डिंग्ज लावण्यास पालिका परवानगी देणार असल्याने सणांच्या आडून बॅनरबाजी करून फुकटात चमकेगिरी करणार्यांना लगाम बसणार आहे. उच्च न्यायालयाच्या तंबीनंतर पालिकेने मुंबईतील बॅनर, होर्डींग हटवण्याची मोहीम सुरू केली आणि होर्डींगमुक्त मुंबई करण्यासाठी नवीन धोरण आणण्याची तयारी सुरू केली आहे. या धोरणानुसार राजकारण्यांच्या बॅनरबाजीला चाप घालण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी सांगितले. मात्र सामाजिक आणि धार्मिक उत्सवांपैकी सरकारी योजनांचे पोस्टर लावता येतील, असेही त्यांनी नमूद केले.
ठिकठिकाणी लावण्यात येणार्या बॅनर्स-होर्डिंग्जमुळे मुंबई विद्रुप दिसू नये यासाठी आता प्रत्येक वॉर्डात केवळ २0 बॅनर्स, होर्डिंग्ज लावता येणार आहेत. यासाठी प्रत्येक वॉर्डात २0 जागा राखीव ठेवण्यात येणार असून, प्रथम येणार्याला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अडतानी यांनी सांगितले.मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणारे बॅनर्स, होर्डींग्जवरील नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे फोटो पाहून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे अडतानी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment