बुधवारी सकाळी सातच्या सुमारास विद्याविहार ते घाटकोपर स्थानका दरम्यान डाऊन स्लो मार्गावरील ठाण्याच्या दिशेने जाणा- या लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती . मात्र धीम्या लोकल फास्ट ट्रॅकवरुन वळवण्यात आल्यामुळे वाहतूक तुरळक प्रमाणात सुरु करण्यात आली असून बिघडलेल्या लोकलला मार्गातून बाजूला काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
विद्याविहार स्थानकावरुन घाटकोपरच्या दिशेने निघालेली लोकल जॉली जिमखान्याच्या येथे पोहचल्यावर लोकलचा पेन्टाग्राफ तुटला . त्याच झटक्यामुळे ओव्हरहेड वायचेही नुकसान झाल्यानेडाऊन स्लोमार्गावरील वाहतूक कोलमडली . मात्र पर्यायी व्यवस्था म्हणून स्लो मार्गावरील सर्वलोकल गाड्यामाटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आल्या. यालोकल गाडया तांत्रिक अडचणदूर होईपर्यंत विद्याविहार, कांजुरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर थांबणार नसल्याने प्रवाशांनात्रास सहन करावा लागला. फास्ट लोकलवर या बिघाडाचा काहीही परीणाम झाला नसला तरी फास्ट ट्रॅकवरील लोकलची संख्या वाढल्याने डाऊन फास्ट लोकल उशीराने धावत होत्या. अनेक कार्यालयांना आज धुलीवंदनाची सुटी असल्याने चाकरमान्यांची लोकल ब्लॉकमधून अनेकांची सुटका झाली आहे
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment