मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील शालेय विद्यार्थ्यांसाठी सन २0१२-१३ या शैक्षणिक सहली आयोजित करताना वर्गातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचीच निवड करण्याचे धोरण असून हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल. तसेच अशाप्रकारे विद्यार्थ्यांमध्ये भेदाभेद करणे योग्य नसून अशा सहलींना आपला विरोध असल्याचे राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी सांगितले. याबाबत आपण शिक्षण समिती अध्यक्षा तसेच अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांच्याशी संपर्क साधल्याचेही सईदा खान यांनी स्पष्ट केले.
पालिका शाळेतील ४ ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी २0१२-१३ या शैक्षणिक वर्षाकरिता विनामूल्य शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येत आहे. या सहलींसाठी अतिरिक्त आयुक्त यांनी शाळेपासून १00 किलोमीटर परिसरात सहलीस अनुमती दिली आहे. या सहलींसाठी शैक्षणिक इयत्तेप्रमाणे तीन गट करण्यात आले असून, या सहलींसाठी विद्यार्थ्यांची निवड करताना वर्गातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. सहलीच्या खर्चामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रवासाचा खर्च, सकाळी चहा-न्याहारी, दुपारचे भोजन, सायंकाळचा चहा, नाष्टा, विमा उतरण्याचा खर्च, सहलीच्या फोटोचा खर्च इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे. दरम्यान, सहलींचे नियोजन इयत्ता ४ थी, इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते ९ वी यांच्यासाठी वयोर्मयादेनुसार करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment