मुंबई : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची झळ बसत असताना मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सहाही जलाशयांमध्ये मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने मुंबईकरांना ३१ जुलै २0१३ पर्यंत पाण्यासाठी कसलीही चिंता करण्याची गरज नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सहाही तलावांत मिळून ५ लाख २४ हजार ७१५ दशलक्ष लिटर्स पाण्याचा साठा उपलब्ध असल्याची माहिती जलविभागाचे उपायुक्त रमेश बांबले यांनी दिली.
सध्या नवीन मध्य वैतरणा धरणाचे काम अंतिम टप्प्यात असून गेल्या वर्षीपासून या धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली असल्याचे बांबले यांनी सांगितले. परंतु कसारा-जव्हार राज्य महामार्गावरील वैतरणा नदीवरील पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळेत झाले नसल्याने जुलै २0१२ मध्ये या धरणात ७0 दशलक्ष लिटर्स पाण्याची साठवणूक केली होती. हा पूल मे २0१३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे बांबले यांनी सांगितले.
वीज प्रकल्प पालिकेला द्या!
मध्य वैतरणा धरणातून २५ मेगावॅट वीज निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र याचा पालिकेला अधिकार मिळावा, यासाठी शासनाला पत्र पाठविले असल्याचे बांबले यांनी सांगितले. मात्र याचे अद्यापि उत्तर आलेले नाही, असे सांगत ही वीज बेस्टला देता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment