मुंबई : अन्नाचा हक्क, आरोग्य सोयीसुविधा, घरकुल प्रश्न, कसायला जमीन, जात, जमात, समाज आणि लिंग यांच्या नावाने होण्यार्या अन्यायापासून मुक्त जीवन जगण्याचा हक्क, या मागण्या घेऊन भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या वतीने संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. १९ मार्चला दिल्लीत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशाचा विकास म्हणजे कशाचा व कुणाचा विकास, हे समाजाला समजावून सांगण्यासाठी देशव्यापी संघर्ष संदेश यात्रेचे व १९ मार्चला दिल्लीतील मोर्चाचे आयोजन केले आहे. सीलिंगचा कायदा धाब्यावर बसवून ४ कोटी ६२ लाख एकर जमीन काही लोकांनी बळकावून ठेवली आहे; पण यापैकी फक्त ५९ लाख ४0 हजार एकरच सरकारने जाहीर केली आहे. जगात उपासमारीने त्रासलेले ७८ देश आहेत.
त्यात भारताचा ६५ क्रमांक आहे. शहरात ३२ व खेड्यात २६ रुपये रोज कमावणारे श्रीमंत आहेत, अशी सरकारने गरिबीची व्याख्या केली आहे. ६ कोटी ६७ लाख टन १ जानेवारी २0१३ रोजी सरकारी गोदामात सडक्या अवस्थेत सापडले. रोजगारीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. स्वस्त औषध व आरोग्यासाठी रुग्णालयात सोयीसुविधा नसते, भ्रष्टाचार गाडून टाकण्याचे फक्त आश्वासन देणे या व इतर मागण्यांबाबत सरकारला काळजी नाही. त्यासाठी ही देशव्यापी संघर्ष संदेश यात्रा काढण्यात येत आहे, असे डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment