अँट्रॉसिटीच्या खटल्यासाठी वकिलांची फौज उभी करणार - राजा ढाले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 March 2013

अँट्रॉसिटीच्या खटल्यासाठी वकिलांची फौज उभी करणार - राजा ढाले


मुंबई : फुले-आंबेडकरी विचारधारेच्या वतीने अँट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत योग्य त्या वकिलांची राज्यभर फौज उभी करण्यासाठी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात ७ एप्रिलला ११ ते ५ या वेळेत एका परिषदेचे आयोजन केले आहे, अशी माहिती फुले-शाहू विचारधारेचे संस्थापक राजा ढाले यांनी शुक्रवारी पत्रकार संघ येथे दिली.

समाजाभिमुख वकिलांची फौज निर्माण करून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या परिषदेच्या माध्यमातून सुरू करणार असल्याचे सांगत ढाले म्हणाले, अँट्रॉसिटी अँक्ट खालील खटले यशस्वी होण्याचे प्रमाण कमी आहे. अशा खटल्यात योग्य त्या वकिलांची कमतरता भासत आहे. पोलीस स्टेशनमधील यंत्रणा या कायद्यापासून अनभिन्न असल्यासारखे वागत आहे. याचा परिणाम गुन्हेगार मोकाट फिरत असतात. ज्या केसचा पायाच तकलादू असेल ती केस कुठलाही निष्णात वकील जिंकू शकणार नाही, असे ढाले म्हणाले.

या परिषदेस समाज क्रांतिकारक अँड़ एकनाथ साळवे (चंद्रपूर) आणि अँड़ अरविंद देशपांडे हजर राहणार आहेत. जे अँड़ पदवी घेऊन बेरोजगार आहेत, त्यांना ही परिषद मोलाची ठरणार आहे. बौद्ध कायद्याची गरज नाही. कायदा धर्माला अनुसरून नसावा. सदाचार म्हणजेच बौद्ध धर्म, धर्मवाद कायद्यात नको, असे सांगत बौद्ध कायद्याला नैतिक विरोध ढाले यांनी या वेळी दर्शवला. 

वकिली गुंडाळून राजकारणात जाणार्‍यांनी राजकारण गुंडाळून वकिली केल्याचे उदाहरण नाही. त्यासाठी सरकारी वकिलांच्या अयोग्य भूमिकेविरोधात परिषदेचे तयार होणारे वकील समाजातील अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी उभे राहतील, असे ढाले म्हणाले. हिंदू, बौद्ध आदी धर्माच्या विवाह कायद्याबद्दल थेट प्रश्नाला उत्तर देताना ढाले म्हणाले. भिक्षूची गरज नाही. कायद्यापेक्षा माणूस महत्त्वाचा. कोर्ट मॅरेज सर्वात चांगले, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad