शिक्षणमंत्र्यांची परीक्षा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 March 2013

शिक्षणमंत्र्यांची परीक्षा

मुंबई / http://jpnnews.webs.com : बारावी पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार, कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील विविध शिक्षक संघटनांनी पुकारलेले आंदोलन तसेच शाळांच्याही उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार इत्यादींच्या पार्श्‍वभूमीवर आता विविध शिक्षक संघटना आपले आंदोलन आणखी तीव्र करणार असून शिक्षण मंडळाला जर ही आंदोलने थांबवता आली नाहीत, तर येत्या ११ मार्च रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघातर्फे राज्यभरातील ६0 हजार शिक्षकांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व आमदार विधिमंडळात कायम विनाअनुदानित शाळांच्या मुद्दय़ावर प्रश्न विचारून राज्य सरकारला भंडावून सोडणार आहेत. त्यामुळे येत्या ११ मार्च रोजी शिक्षण मंत्र्यांचीच परीक्षा विधिमंडळाच्या अधिवेशनात असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad