शिवडीच्या टीबी रुग्णालयात रुग्णांच्या कपड्यांमुळे इन्फेक्शन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 March 2013

शिवडीच्या टीबी रुग्णालयात रुग्णांच्या कपड्यांमुळे इन्फेक्शन

- आठवडाभर कपडे धुतले जात नाहीत
- निर्जंतुकीकरण मशीन चार वर्षांपासून बंदमुंबई - शिवडी टीबी रुग्णालयात रुग्णांना कितीही औषधे दिली तरी अंगावरचे कपडेच आठवडाभर धुतले जात नसल्याने सतत जंतुसंसर्ग होत आहे. रुग्णांच्या कपड्यांचे निर्जंतुकीकरण करणारे ऑटोक्लेव्ह मशीन कामगाराअभावी बंद पडून आहे. परिणामी रुग्णांचे कपडे धुण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवावे लागत आहेत.

रुग्णांचे कपडे धुऊन निर्जंतुक करण्यासाठी २९ मार्च २००० रोजी ३ लाख ४६ हजार १०० रुपये खर्चून टीबी रुग्णालयात मशीन आणली गेली. ती चालवणारा कामगार २००५ रोजी निवृत्त झाला. त्यानंतर कोणीही नियुक्त करण्यात आलेला नाही. कपडे धुतलेच जात नसल्याने रुग्णांना आठवडाभर एकाच कपड्यावर राहावे लागत आहे. टीबी रुग्णांचे कोट, पायजमा आणि चादरी असे २८०० कपडे दर आठवड्याला कस्तुरबा रुग्णालयात धुण्यासाठी पाठवले जात आहेत. 

कपड्यांवर आठवडाभर जंतू तसेच राहतात. मग रुग्णांना फक्त औषधे घेऊन काय फायदा होणार? रुग्णच नव्हे तर परिचारिका, कामगारांनाही टीबीची लागण होत आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बामणे आणि विशेष अधीक्षक डॉ. उमेश आयगल यांना जंतुसंसर्ग होत नसल्याने ते मात्र निश्‍चिंत आहेत. 
- प्रदीप नारकर, म्युनिसिपल मजदूर युनियन

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad