'जेक्स्टर सिम'ग्लोबल सिम कार्डचे उद््घाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 March 2013

'जेक्स्टर सिम'ग्लोबल सिम कार्डचे उद््घाटन

मुंबई : हॉटमेलचे जनक साबीर भाटिया यांनी विदेशात जाणार्‍या प्रवाशांच्या सुविधेसाठी 'जेक्स्टर सिम' या नव्या ग्लोबल सिम कार्डचे उद््घाटन केले. जेक्स्टर सिमकार्ड फिचर फोनपासून अँण्ड्राईड, आयफोन, विंडोज आणि ब्लॅकबेरीच्या साधनांमध्ये वापरता येऊ शकतो.

साबीर भाटिया आणि योगेश पटेल यांनी संयुक्तरीत्या स्थापन केलेल्या जेक्स्टर या कंपनीच्या सीमच्या माध्यमातून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कॉल आणि एसएमएस करता येऊ शकतो. जेक्स्टर सिम सर्व अनलॉक्ड फोन्सवरही काम करते. जेक्स्टर सिममध्ये ऑनबोर्डिंग प्रक्रिया तसेच पारदर्शक बिल यंत्रणा आहे. यामध्ये कोणतेही छुपे दर आकारले जाणार नाहीत. एकाच सिमचा वापर व्हॉईस, टेक्स्ट आणि डेटा वापर करण्यासाठी येऊ शकतो. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपेक्षा जेक्स्टर सिम ८५ टक्क्यांपर्यंत स्वस्त आहे. दूरध्वनी, टेक्स्ट आणि ब्राऊझिंगशिवाय व्हॉईस मेल, एसएमएस फॉरवर्ड करणे आणि व्हॉईस मेल टू ई-मेल अशा अद्ययावत वैशिष्ट्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

जेक्स्टर सिमद्वारे आंतरराष्ट्रीय प्रवाशात बिल्सची काळजी मागे ठेवता येऊ शकते. तसेच आंतरराष्ट्रीय कॉलिंग दरामुळे प्रवास अडथळ्याविना होऊ शकते, अशी माहिती जेक्स्टर आयएनएसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी साबीर भाटिया यांनी दिली आहे. सध्याच्या काळात कमी खर्चात उपाययोजना देण्यासाठी एक जागतिक टेलिकॉम नेटवर्क या सिम कार्डद्वारे ग्राहकांना मिळाले असल्याचे अध्यक्ष योगेश पटेल यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad