महावितरण ग्राहकांना मिळणार ऑनलाइन दरपत्रक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 March 2013

महावितरण ग्राहकांना मिळणार ऑनलाइन दरपत्रक

मुंबई : कृषी, घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना आता ऑनलाइन नवीन जोडणी घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. ही जोडणी घेण्यासाठी भरावयाच्या पैशांचे दरपत्रकही संगणकाच्या माध्यमातून दिले जाईल. जोडणीचे पैसे किती, याची आकडेमोड करायची गरज स्थानिक कार्यालयांना राहणार नाही, अशी माहिती महावितरणने मुंबईत दिली.

ग्राहक शिक्षणाचा भाग म्हणून जोडणी घेण्यासाठी किती पैसे भरावे लागतील, याचा तपशील असणारे पोस्टर्स सर्व कार्यालयांत यापूर्वीच लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सप्रमाणे या संगणीकृत दरपत्रकामुळे ग्राहकांना नवीन जोडणीसाठी किती पैसे भरावे लागतील, याचा अचूक तपशील मिळायला मदत होणार आहे. ऑनलाइन अर्ज करणार्‍या ग्राहकांना संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल पत्ता देणे बंधनकारक आहे.

कंपनीचे कॉल सेंटर या प्रस्तावित ग्राहकाशी संपर्क साधून त्यांनी दिलेल्या माहितीची खात्री करून घेईल आणि संबंधित कार्यालयाकडे हा तपशील पाठवेल. त्यानंतर शहरी भागात सात दिवसांत व ग्रामीण भागात दहा दिवसांत संबंधित उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी ग्राहकांशी संपर्क साधतील. त्यांच्या जागेची पाहणी करून नवीन जोडणीच्या ए १ फॉर्मवर ग्राहकांची सही व संबंधित कागदपत्रे घेतील. त्यानंतर संबंधित उपविभागीय कार्यालय जोडणी देण्यासाठी संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. जोडणी मिळण्यास दिरंगाई होत असल्यास ग्राहक टोल फ्री क्रमांक १८00२-३३३४३५, 00३४३५ यावर संपर्क साधू शकतील, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad